कोविड काळात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब झाले. आर्थिक विषमतेत भर पडली!
रोजगार गेल्याने, वेतनातील कपातीमुळे, व्यवसाय बंद झाल्याने, व्यवसायातील आर्थिक उलाढाल कमी झाल्याने प्रति व्यक्ती खर्च सर्व स्तरांत कमी झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बचत, नवीन गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे २०२०-२०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था अंदाजे ७.५ टक्के घसरली. सोने-चांदी, शेअर्स यांच्या किमतीत वाढ झाली. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार भारतातील १०० अब्जाधीश यांची संपत्ती या एका वर्षात १२.९७ लाख कोटी इतकी (३५ टक्के) वाढली.......